Search This Blog

Monday, 7 September 2020

वृंदावन

 

सौ. वृंदा दत्तात्रय दांडेकर
आज देखील  तिचा चेहरा डोळ्यासमोर आला की तिचं ते      प्राजक्ताच्या  सड्या सारखं प्रसन्न हास्यच डोळ्यासमोर येत. चार फूट अकरा इच उंची. गोल गुलाबी चेहरा सरळ नाक आणि निळसर झाक असलेले राखाडी डोळे. दांडेकरांची वृंदा. म्हणजेच माझी आई. बरीच वर्ष लोटली तिला देवा घरी जाऊन. पण आम्ही भावंडेच नाही तर तिच्या संपर्कात आलेली मंडळी देखील राहून राहून म्हणतात, “तिच्या सारखी तीच.”

पनवेलच्या भाटे कुटुंबात अत्यंत लाडाकोडात वाढलेली मंदाकिनी पालघरच्या प्रतिष्ठित घराण्यातली मोठी सून म्हणून वाजत गाजत आली आणि मग, ती प्रतिष्ठा सांभाळत आणि आपल्या माहेरच्या मध्यम वर्गीय संस्कारांची शिदोरी वापरत आपलं एक स्थान निर्माण करून गेली.

 

अत्यंत प्रेमळ पण शिस्तप्रिय, साधी पण नीटनेटकी,  सुशील-सुगरण-स्वावलंबी-स्वाभिमानी अशी ही आमची आई. अगदी चार चौघींसारखी संसारी स्त्री. तुमची आमची सगळ्यांची असते तशीच आई.. पण तरीही खूप वेगळी.

आज ती आम्हा भावंडांना अनेक रुपात आठवते. स्वयंपाक घरात असताना अगस्तीच्या

फुलांची भाजी देखील अत्यंत रुचकर बनवणारी अन्नपूर्णा. त्या वाडीतल्या एकाकी घरात रहात असताना खिडकीतून बंदूक काढून मांडवात आलेल्या कोल्ह्याना पळवून लावणारी रणरागिणी, शेताची अत्यंत काळजीने निगा राखणारी प्रयोगशील शेतकरी, आमच्या हातून खेळताना ट्यूब फुटली असता न रागावता सा-या काचा बाजूला करून आत काय असते ते समजावून सांगणारी वैज्ञानिक, "पानात वाढलेलं निमूट पणे खा" किंवा "एक वेळ फाटका कपडा घातलास तरी चालेल पण मळका नाही घालायचा" असे धमकावणारी दुर्गा माता. बाहुलीच्या लग्नात आमच्या बरोबरीने रमणारी नीज शैशवास जपणारी बालिका. किती तरी रूपे या एका व्यक्तीत सामावलेली.

आपली मुले अत्यंत छोट्या गावात राहतात पण उद्या ती मोठी होतील आणि तेव्हा ती बावचळून जातील म्हणून पदर मोड करून वर्षातून एकदा आम्हाला मुंबई च्या posh उपहारगृहात घेऊन जाणारी आणि तेथे फोर्क ने डोसा कसा खायचा याचे धडे देणारी personality groomer.

सुंदर माझं घर आवडीने बघणारी सुगृहिणी आणि आमची माती आमची माणसं तितक्याच आत्मीयतेने पाहणारी प्रतिथयश शेतकरीण.

दादांच्या प्रतिष्ठेसाठी दोन डझन कलाकारांची जेवणाची सोय दुसरी कडे कुठे होत नाही हे कळल्यावर सा-यांच्या जेवणाची सोय करणारी सहधर्मचारिणी, जणू तिला द्रौपदीची थाळीच प्राप्त झाली होती.

आणि या बरोबरच कितीही मोठे कलाकार किंवा सुप्रसिद्ध व्यक्ती (अगदी पोन्डिचेरीचे तत्कालीन राज्यपाल का असेनात) घरी आले तर या घरात मद्यपान अथवा धुम्रपान करतायेणार नाही असे परखडपणे सांगून वास्तूचे पावित्र्य राखणारी तत्वनिष्ठ आर्या.

प्रवास म्हणजे जीव की प्राण, मग तो बजाज च्या स्कूटर वरून असो नाही तर विमानातून

विहिणी बरोबर फुगडी

तितक्याच उत्साहाने फिरायला
निघणारी पर्यटन प्रेमी भटकंती वीर.

 

परमेश्वरावर श्रद्धा असणारी, पूजा अर्चा करणारी, एक हजार वेळा शिव शंभो कैलासपते... भक्ती भावाने लिहिणारी.. शिव भक्त ..

परंतु माणसाची क्रिया कर्म करण्यापेक्षा तो असताना काय ते करा असे ठाम पणे सांगण्या इतकी स्वतंत्र विचाराची स्वतंत्र स्त्री.

अजितने एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण नीट केल्यावर अत्यंत आनंदित होणारी ... नवीन टेकनॉलॉजि बद्दल अतीव आत्मीयता असणारी .. तंत्र प्रेमी....

अनेक श्लोक, आरत्या मुखोद्गत असणारी आणि त्याच बरोबर जुनी  कुणालाच अवगत नसलेली  हिंदी-मराठी गाणी म्हणून भेंड्या चढवणारी संगीत प्रेमी...

अनेक नातेवाइकानी वाळीत टाकूनही त्यांना थोडी उपरती झाल्यावर माफ करणारी क्षमाशील स्त्री..


ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत, सुप्रसिद्ध गायिका जानकी अय्यर यांसारख्या व्यक्ती तिला भेटायला आणि तिच्याशी गप्पा मारायला आवर्जून घरी यायच्या. समोरच्या बंगल्यात राहणाऱ्या निवृत्त न्याशाधीश अक्का कुलकर्णी तर रोजच येऊन बसायच्या.  त्यांच्याशी बोलून (म्हणजे बहुधा त्याचे ऐकून)  आणि त्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ खिलवून तृप्त करणारी चांगली listener अशी आमची आई.

तिला कवयित्री इंदिरा संत (अक्का ) दांडेकरांची तुळस असेच म्हणायच्या.

होतीच तशी ती, पवित्र मनाची,  सुगंधी तनाची, औषधी विचारांची आणि अमोघ आत्मीय मनोबल लाभलेली, साधीसुधी, एका जागी निश्चल राहून आम्हा सा-यांना सतत आशीर्वचन देणारी तुलसी माता. 

 

    अनघा जोशी            अश्विनी सोवनी           अजित दांडेकर

 

49 comments:

  1. Very excellent nicely expressed about your mother. Really tulus is true described by great indira sant ji. 🙏 🙏 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Your Aie was a personification of affection , simplicity and purity. She always welcomed me with open arms. I have such fond memories of time spent in your house.

      Delete
  2. अश्विनी, तू केवळ उत्तम लीहीतच नाहीस तर त्यात पुनः पुनः वाचायची इच्छा निर्माण व्हावी असे वर्णन असते....हा लेख वाचून तसेच झाले. गोड आठवणी आणि आईबद्दल वाटणारा जिव्हाळा, प्रेम आणि प्रचंड स्फूर्ती, हे सगळे किती सुरेख पद्धतीने मांडले आहेस...खरंच तुम्हा भावंडांचे किती कौतुक करावे तितके थोडेच आहे. फार छान वाटले हे वाचून. त्या तुला बघत असतील, तुझ्या स्वतःच्या journey कडे बघून किती आनंद होत असेल त्यांना...इथे सांगावेसे वाटते की तुझ्या अंगी जे गुण आहेत, तुझे रूप, विचारशक्ती, सगळं सगळं त्यांनी तुला भरभरून दिले आहे,असे म्हंटले तर त्यात काहीच चुकीचे नाही. अशीच रहा...

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे प्रिया. आपल्या आई वडिलांकडून आपल्याला खूप काही मिळते. Thanks.

      Delete
  3. Excellently written!
    But more than the writing I adored the human being that she was.... your mother. Talented, disciplined, lovable, responsible, futuristic, a good communicator, et all... a complete personality.

    ReplyDelete
  4. वाह आश्विनी,खूप छान वर्णन केलंयस आईच... तुझ्या घरी मी फक्त एकदाच पोचलेय,आईचा चेहरा नाही.. आठवत पण रंग मात्र आठवतो..😊 तुझ्या आईच्या स्वभावाचं वर्णन करताना काही प्रत्यक्ष घटनांच वर्णन करताना तुझी आई कशी बंदूक रोखून उभी होती असेल हे चित्र समोर आल,किंवा ट्यूब लाईटच्या काचा गोळा करताना दिसत होती... तुझ्या आईचा स्पष्टवक्तेपणा तुझ्यात आहे..शाळेत असल्यापासून स्वतःची मतं ठामपणे मांडणारी तू आहेस.. सुंदर लिखाणाबद्दल तुझ अभिनंदन आशी...👌🏻👌🏻💐

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Alpi. खूप छान अभिप्राय

      Delete
    2. व्यक्तिचित्रण खूप छान. आम्ही उभयतांनी काकूंचं आतिथ्य आणि अगत्य अनुभवलंय.बाळासाहेबांबरोबर त्यांची आठवण हटकून येतेच.त्यांच्या स्म्रुतीला वंदन.

      Delete
  5. Very well worded! I could really envision her saying or doing the things you narrated. Indeed a wonderful way of remembering and honouring the gem of a person that she was!

    ReplyDelete
  6. सुंदर साहित्याचे उत्तम उदाहरण! अतिशय आनंद झाला
    असेच लिहीत रहा. शुभेच्छा! प्रा.सुभाष भावे, पुणे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे.

      Delete
  7. खूप खूप सुंदर लिहिलं आहेस अश्विनी.....आई डोळ्यापुढे उभी राहिली.....किती सात्विक...किती साधी....निर्मळ...

    ReplyDelete
    Replies
    1. आभार. एका लेखिकेचा अभिप्राय म्हणून आणि मैत्रीण म्हणून खूप मोलाचा

      Delete
  8. खूप छान..अगदी सरळ अन सोप....मस्त लिहिलंय....काकू अगदी डोळ्यासमोर उभ्या होतात.तुझ्या अप्रतिम लेखनाबद्दल..खूप अभिनंदन 💐👏

    ReplyDelete
  9. नमस्कार, व्वा सुंदर.काकू मला खूपच कमी आठवते...पण जेव्हा जेव्हा भेटली तेंव्हा कायम प्रसन्नच मूर्तीच डोळ्यासमोर येते. घरी गेल्यावर हातावर काहीतरी खायला दिल्याशिवाय सोडत नसे. छान माहिती दिली आहे.
    जयंत दांडेकर (बाळकाकाचा *चांदोबा*)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपण वेळ काढून वाचलेत आणि अभिप्राय नोंदवला त्याबद्दल आभार.

      Delete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. Amazing maushi! She was absolutely exactly the way you have described her wonderfully weaving the many excellent aspects of Ajji! It is as beautiful as Vrunda Ajji's embroidery used to be!!! I really wish we had more time with her :(

    ReplyDelete
  12. व्यक्तिचित्रण खूप छान. आम्ही उभयतांनी काकूंचं आतिथ्य आणि अगत्य अनुभवलंय.बाळासाहेबांबरोबर त्यांची आठवण हटकून येतेच.त्यांच्या स्म्रुतीला वंदन. सिद्धी व विनय कुलकर्णी, बेळगांव

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. खूप छान वाटले आपण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवली त्या बद्दल.

      Delete
  13. Vrunda vahini was a pure soul.During my posting as Seior Divisional Manager at Belgaum She has hosted tasty
    Delicious lunches to me.She was always happy and and caring lady supporting my close friend her husband Bala Sahib in difficult times. My deepest respects and regards to her memories. The worthy couple helped me a lot and I feel obliged to them for ever. The children are highly worthy and are the result of her worthy rearing. Ever Grateful

    ReplyDelete

  14. Very well written. I always wonder Ashwini that how you can manage your cycling, trekking, writing,teaching and at same time taking care of family. Now I realised that you are carrying all qualities of your mother. Great personality.

    ReplyDelete
    Replies
    1. ईश्वर कृपा आणि वडीलधार्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. धन्यवाद.

      Delete
  15. Inspiring Blog. Very Aptly described her throwing light on different facets of her nature.

    ReplyDelete
  16. हंस जसा मोती वेचत असतो तसे आईचे गुण वेचून शब्दात मांदलेस अशा मातेस प्रणाम धन्य तू आणि तुझे लेख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपले आईवडील हेच फक्त या जगात आपल्याला निवडता येत नाहीत. ही फक्त ईश्वर कृपाच. तोच करता करविता.

      Delete
  17. मला माझी भाची रागावल्यावर, लाजल्यावर ,आनंदात एवढंच काय मुसमुसुन रडताना ,लाल गोरी झालेली अजूनही डोळ्यासमोर येते।उत्तमलिखान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. खूप छान वाटले आपला अभिप्राय वाचून. नाव कळू शकेल का?

      Delete
  18. I never had the chance to meet your Ajjis
    But was fortunate to spend time with your mum
    She was definitely one of the most kind and gentle people I have come across in my life .
    And , definitely an Annapurna
    Always got a warm welcome at Dandekars" abode.

    ReplyDelete
  19. Thanks a lot Reshama for the comment. I still remember how Aai always looked forward to you visiting our home. Cherished memories.

    ReplyDelete
  20. Your mother is Great Mother Godess. I salute her for her all round greatness and bringing up her Children so well.

    ReplyDelete
  21. खूपच हृदय स्पर्शी आणि प्रत्येक पैलू सहजतेने नमूद केले आहेत. रणरागणी ते अती लोभस गृहिणी.

    ReplyDelete
  22. Your Mother is the Great Personality.

    ReplyDelete
  23. Like Mother, Like Daughter & Grand Daughter..What a Legacy.

    ReplyDelete

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

हीच खरी आतरंगी माणसे 😀 जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नो...