Friday 1 October 2021

रेशमाची आज्जी

 

हीराबाई दत्ताराम जोशी 
रेशमाची आज्जी 
बेळगावला असताना मी रेशमाच्या घरी जवळजवळ रोजच जायचे. म्हणजे तिच्या कडे पडीकच असायचे म्हणा ना. आमची घरे टिळक वाडीत अगदी जवळ होती म्हणून आणि माझ्या पालकांना वाटायच की मी थोडी तरी चांगल्या संगती मुळे सुधारेन. 😁

कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस तर होतेच पण अनेक नव नवीन अनुभव घेण्याचे ही होते. माझ्या त्या कोवळ्या संवेदनशील वयात ज्या काही व्यक्ति मला भेटल्या त्यांची प्रतिमा आज देखील माझ्या मनात ताजी आहे. लहान पणा पासून माझी आज्जीच्या नात्याची संकल्पना दृढ होत गेली ती गोष्टीची पुस्तके वाचून. मला नेहमी वाटायचे आपल्या घरात आपल्या बरोबर रोज राहणारी आपली प्रेमळ आजी पाहिजे बुवा. माझ्या दोन्ही मोठयाई (आजी) दूर राहायच्या त्यामुळे त्यांचा रोज सहवास अशक्यच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर पडत गेलाच. पण मला अगदी गोष्टीत वाचल्या सारखी सतत आपल्या घरात राहणारी प्रेमळ आजी प्रथम भेटली ती रेशमाच्या घरी.

माझी रेशमाची नवीन नवीन ओळख झाली ती कॉलेज मधे.  मग कधी तरी मी तिच्या घरी जायला लागले. तिचे वडील बेळगाव मधील सुप्रसिद्ध सर्जन. त्या मुळे थोडी बिचकतच मी तिच्या घरात गेले. काकूंनी मला बसायला सांगितले आणि त्या रेशमाला बोलवायला गेल्या. समोर एक साठीच्या सूती नऊवारी साडी नेसलेल्या बाई बसल्या होत्या. बहुधा रेशमाच्या ड्रेस ला बटण लावत असाव्यात. आणि त्याच क्षणी मला ती गोष्टीच्या पुस्तकातली प्रेमळ आजी भेटली. रेशमाची आजी.

आणि मग ती मला परत परत भेटत गेली विविध प्रसंगी, विविध वेळी,  पण नेहमीच त्या प्रेमळ प्रसन्न हसतमुख आविर्भावात.

माझ्या आयुष्यात आजवर पाहिलेली  ही  एक अत्यंत प्रसन्न व्यक्ती. सुंदर गोरा हसतमुख चेहरा. धारदार नाक, मोठे गोल कुंकू, बांधेसुद उंच अंगकाठी आणि प्रसन्न हास्य सतत ओठांवर पसरलेले.  घरंदाज  आणि अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत्व, प्रेमळ डोळे आणि सारस्वती कोंकणी ढंगाची मधुर वाणी. माझ रेशमाशी चांगल जमायच (म्हणजे ती माझ्याशी जमवून घ्यायची)😀 म्हणून तर मी तिच्या कडे जायचेच पण त्या बरोबर तिच्या आजीला भेटायची एक अनामिक ओढ मला लागलेली असायची. आणि एखाद्या दिवशी जर नाही भेट झाली तर मन खट्टू व्हायच.

रेशमा त्यांना बिनधास्त आपल्या ड्रेस ला बटण लाव वगैरे सांगून मोकळी व्हायची तेव्हा तर मला तिचा हेवाच वाटायचा. त्यात वर कधी कधी तिची आजी तिला आपण होऊन काही तरी मदत करायची तेव्हा तर मनोमन वाटायच एक दिवस या आजीला आपण हायजॅक करायचच.

परीक्षा जवळ आली की मी रोजच रेशमाच्या घरी जाऊ लागायचे. आम्ही एकत्र अभ्यास करायचो. कधी

आजीचा लाडोबा 

तरी लवकर गेले तर त्यांची नुकतीच जेवणं उरकलेली असायची. मग आई आणि आजीची टेबल रिकाम करण्याची लगबग सुरू व्हायची. जेवणात त्या दिवशी मासे असले तर विशेषच गडबड व्हायची त्यांची. मला खूप दिवस प्रश्न पडायचा या इतक्या गडबडीने टेबल का रिकामे करतात? मग समजले, मला उगाच मशाच्या वासाचा त्रास होऊ नये म्हणून ही खटपट. इतकी छोटीशी बाब पण एखाद्याचा इतका विचार करण्याचा मोठेपणा. कधी तरी त्या मला गंमतीने “तुम्ही भट, तुला उगाच माशाचा वास देखील नको यायला” असे म्हणायच्या तेव्हा तर मला खूप गंमत वाटायची. त्यांच्या तोंडून ते कोंकणी ढंगाने तुम्ही भट असे ऐकणे देखील खूप छान वाटायचे.

रेशमा लग्न होऊन लंडन ला गेली. आणि मी धारवाडला पुढील शिक्षणा साठी गेले. मग बेळगावाला गेले की कधीतरी रेशमाच्या घरी चक्कर मारायचे. पण त्यांना मी कधीच सांगू शकले नाही की त्या माझ्या रोल मॉडेल आजी होत्या. गोष्टीच्या पुस्तकांतून थेट खऱ्या खऱ्या झालेल्या.

माझे लग्न ठरल्याचे कळल्यावर त्या काकूं बरोबर माझ्या सासरच्यांना भेटायला आल्या होत्या. अत्यंत आनंद झाला होता त्यांना. त्यांच्या डोळ्यातलं ते कौतुक बघून मी अगदी तृप्त झाले त्या दिवशी. रेशमा इतकीच त्यांना माझी काळजी आणि कौतुक होते हे बघून भरूनच आले मला.

जेव्हा मी रेशमाच्या आजीला प्रथम भेटले तेव्हाच मी एक स्वप्न पाहिल होत. माझ्या मुलांना सुद्धा अशीच आजी मिळाली पाहिजे, प्रेमळ, शांत, मृदु स्वभावाची. त्यांचे लाड करणारी. त्यांच्या ड्रेस ला बटण लाऊन देणारी,  त्यांच्यावर मायेची पाखर घालणारी. आणि माझ्या नशिबाने मला असच घर मिळाल. माझ्या मुलांना अशीच आज्जी मिळाली आणि त्यांना आजीचा अखंड सहवास आजही मिळतो आहे.

आज रेशमाची आजी या जगात नाही. मला त्यांच्या बद्दलच्या माझ्या भावना त्यांच्या समोर कधीच व्यक्त करता आल्या नाहीत. पण त्यांच्या  आशीर्वादाने माझे स्वप्न मात्र पूर्ण झाले आहे.  माझ्या मुलांच्या आजीच्या रूपाने. आज रेशमाची आजी माझ्या मुलांकडे  पण आहे........

52 comments:

  1. Excellent thought.Perfectly put up loaded with all the respect n utmost affection one can receive from the grand parents who are the most fortunate and richest kids in the world I feel.
    Keep it up Ashwini!!!!

    ReplyDelete
  2. अश्विनीताई तुम्ही खरच भाग्यवान आहात. आपणास प्रेमळ आजींचा सहभाग लाभला. आपले लिखाण असेच सुरु ठेवावे. आपणास आलेल्या अनुभवांचा आनंद इतरांना शब्दाव्दारे द्यावा.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खर आहे. मी नक्की अनुभव शब्दबद्ध करत राहीन. आपल्या सारखे रसिक वाचक असल्यामुळे खूप स्फूर्ती मिळते.

      Delete
  3. सुंदर लिहिले आहे अहिनंदन . असेच लिहीत रहावे. हार्दिक शुभेच्छा. सुभाष भावे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. तुमचा अभिप्राय खूप मोलाचा आहे.

      Delete
  4. You have made me feel very emotional Ashwini
    Ajji certainly was an inspiration

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much. I am glad you liked it. I was planning to write for a long time. It happened now.

      Delete
  5. Lovely article. We are blessed by having Reshma as our only d/law but who is more than a daughter to us.
    Daddy and Mummy Rao.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot Kaka and Kaku. I am also blessed to have a true friend like Reshma.

      Delete
  6. खूपच छान लिहिले आहेस. गोष्ट सांगितल्या सारखे.
    तुझी लेखन शैली खूप आवडली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मकरंद दादा. तुम्ही वेळ काढून वाचले त्या बद्दल आभार.

      Delete
  7. अश्विनी खूप भावले. तू आणि मी खूप नशीबवान. आपल्याला प्रेमळ सासवा आणि आया लाभल्या आणि आपल्या मुलांना घरी प्रेम करणाऱ्या आज्या.

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे सविता ताई. आपण खरंच भाग्यवान. आणि आपली मुळे त्याहूनही भाग्यवान

      Delete
  8. You have written it very nicely...
    I guess its out of minute observation n understanding people around you...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks vishal. Yes god's gift. But I think all of us have this unexplored power.

      Delete
  9. Very well written... Reshma's aji was my maushi..memories of her were revived and tears rolled down my eyes after reading this....

    ReplyDelete
    Replies
    1. Oh. Nice to know. So glad to know that you liked the blog.

      Delete
  10. खूप छान लिहिले आहेस नेहमी प्रमाणेच👌माझी आजी पण खूप प्रेमळ होती ,तिचे विचार खूप चांगले होते..आयुष्यभर खूप कष्ट केले तिने पण तक्रार नाही कधी..

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार. अशी माणसे विरळाच

      Delete
  11. खूप छान लिहिलेस! खरोखरच भाग्यवान आहेस!
    माझी आजी (वडिलांची काकू) स्वतः डॉक्टर होती. आम्हाला सख्या आजीसारखीच होती. असेच आम्ही तिच्याकडे पडीक असायचो विशेषतः सुट्टयांमध्ये. ☺

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान वाटले तुमच्या आजी बद्दल वाचून. धन्यवाद

      Delete
  12. अप्रतिम लिखाण.....खूप छान

    ReplyDelete
  13. वाह खूपच छान... नाजूक सुंदर नात्यांची खूप छान प्रतिमा उभी केलीस.... तुझे शेवटचे वाक्य शतशहा: खरे आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजित. होय. खूप छान अभिप्राय.

      Delete
  14. Our friends and family were touched by your beautiful writing, thank you so much.

    ReplyDelete
    Replies
    1. Pleasure is mine. I wanted to write this blog for a very long time. Was not sure if anybody will like it. Your comments have boosted my confidence. Thank you.

      Delete
  15. मनःपूर्वक आभार नरेंद्र दादा.

    ReplyDelete
  16. A grandmother’s love is forever and always, nicely written.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by a blog administrator.

      Delete
  17. आमच्या पार्ल्याच्या आज्जी ची आठवण झाली... सुंदर लेख 👌👌👌

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. अत्यंत साधी सोपी पण सुंदर माडणी, अगदी मी ही नकळलत माझ्या आजीच्या आठवणीत रममाण झालो. आपणास धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  20. अनुभव शब्दबद्ध करत राहा आपल्या लेखा खूप स्फूर्ती वआनंद मिळतो .खरं सांगायचं म्हणजे तुमच्या प्रत्येक नात्याची एक छान कादंबरी पण होइल किवा तुम्ही एखादे छानसे लघु कथा संग्रह काढा

    ReplyDelete
  21. खूप छान कल्पना. मी नक्की विचार करीन.

    ReplyDelete

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...