Search This Blog

Friday, 7 June 2019

The Dream is closer


Bright Morning
It is a bright day today.  I peep out of the tent to see the Sun rising. The golden sunshine is spreading arms. We are fortunate it is a great weather. After a delicious breakfast we head to our next day of trekking. We are still walking in the meadows. Blue skies, and green mountains welcome us with sparkling sunshine. 





We suddenly stumble upon a small portion of snow. It the first time in this season, we are able to see
Himalayan Resident : Treat to the eyes
the snow. We take pictures and march ahead. There is no change in the surroundings, however the huge Devdar trees are slowly disappearing. And suddenly we are standing in front of a mountain blanketed with the white snow. Dineshji, our tour guide tells us that we must climb this mountain for practice. He briefs us that tomorrow we will be climbing many such mountains in deep snow hence the practice. We carefully march ahead after learning the technique. All of us try to master the technique of walking on the snow with much efforts.


Ashok, Pranav(JCB), Sachin, Kalyani and Prerana
After about 30 minutes of practice full of masti and magic, we finally declare that we are done with it and may proceed further. As we climb another mountain we reach our destination for the day. We have reached rather early and hence we once again do tent pitching and relax for a while. After a sumptuous lunch many disappear in their tents. Some of us decide to sit in the open to absorb the fresh air and golden sunshine. As I am engrossed in a chat with Kalyani and Ashok, Shardul and Tanaya join us. Shardul spots a small rabbit like animal. We take the snaps and proceed to the tents. Ashok wants to try   digging out the snow. We are trying to figure out which fort it is going to be. Finally we are told that he is making Shivaji Maharaj.  This looks like an ambitious plan and we withdraw from it.
his hands on Snow once again. He starts building a structure in the snow. Pranav, our official JCB of the group starts

Sharvari : The Smiling Star
The tea is served by the side of the kitchen tent. Simultaneously Mitraji declares that he will be teaching us how to tie different types of knots  to a rope. Everybody tries his hand. It is a useful exercise indeed. As the time passes by we start preparing for our big day tomorrow. We are going to have a long day, since it is a climb of almost 6 hours and a descend of 3 hours. We are thrilled about this portion of the trek. It is going to be absolute pleasure to climb the mountain filled with snow. Dinesh tells us that we would be starting our trek at 6.00 am in the morning. He gives instructions about back pack and assures us that he will do his best to reach us to the destination. 


Moon Lit Mountains in the midnight
Since it is extremely cold I use my veto and tell everyone to have turmeric milk (Haldiwala Dudh). Some characters who are in the habit of skipping milk since their childhood escape silently. However I am able to hold on to 7 people to drink the milk. Finally we are off to our tents.
Dream Bhrugu
I suddenly wake up in the middle of the night to attend to nature’s call. It is extremely cold and it is impossible to leave the warmth of my sleeping bag. However it is next to impossible to sleep without going out. I curse myself for drinking water in the evening and gather courage to go out. As I come outside, the sky is lit with full moon. The moon looks like a silver disk. It is glowing like a Diwali lantern. I am amazed at the sight. The snowy mountains are bathing in the moonlight. The blue sky is lit with the silvery shiny light spread all over. I am forced to go back to my tent due to the cold. However I do not want to close my eyes with the fear of wiping out the spectacular seen of nature I just captured.  
I fall back to sleep with the dream in my eyes. Dream of moon lit Bhrugu Lake.

Thursday, 30 May 2019

In the lap of Himalayan Mountains

Sixteen on the 16th

It has been more than 15 months since we visited Himalay.  We fondly remember our previous trek and start planning for the next. We quickly have 20 people who want to go. The Whats app group is formed and preparations begin. After a few months the group is reduced to 16 and we finally get on to our flights on the 16th of May 2019. The journey of 16 begins on the 16th. Though  we reach New Delhi in different flights we unite together at Majnu Ka Tila to board the bus to Manali. The bus leaves on time and after a strenuous journey of 14 hours we reach Manali.

Hadimba Temple and Vasisthi are two places one must visit in Manali. Hadimba (Hidimba) was Bhim’s wife and must have been a very popular queen.   Wasisthi is another historical place famous because of the hot water springs. As we reach this place the light showers of rain welcome us playfully. We decide to have food and proceed to the Jugni Falls. As we eat lunch it seems impossible to proceed to the falls. After a walk of about 20 minutes we decide to go back to our hotel at Mall Road. Everybody gets back to the rooms. Chandan, Anirudh and I get busy in planning the trek details with Mitraji and Dinesh Thakur, our trek coordinators. All the minute details are planned as other members also join in. It is already dark and we proceed for the dinner.

Aniruddh, Mayur and Chitaleji
Next morning welcomes us with bright sunshine. We are now eager to start our trek. We eat at Manali sweets and board our vehicles at 11 am. After a journey of 40 minutes or so, we halt at a place called Kothi. This is the place where we would be beginning our trek.





Dinesh gives us some basic instructions of trekking after a headcount. Today is a light day.
Para Gliding-Sachin's Passion
We would be trekking a distance of  just 2 to 3 hours. We suddenly see the paragliders over our head. Sachin remembers our initial discussion regarding Paragliding. He suddenly wants to go to Bir Biling. 


All of us remind him that we have come on a trek and not for leisure. He some how reconciles and we proceed further. The mountains are green. Huge pine trees welcome us with open arms. The blue skies look marvelous. We climb one after the other and keep a steady pace. We would be taking a steep climb today to reach the campsite at Chouda Mod. As we are half way through we take a break for a bite. We have bananas, juice and Five star to munch. We follow our swatch Bharat routine and leave no dry waste behind. We climb further through the forest and suddenly reach our camping site.
Dining Tent

The camp site is getting ready. We relax for a while and start erecting our tents. It seems to be an easy job when others are doing it. However we realize how difficult it is when we do it ourselves. We have not trekked much today hence erecting tents seems to be fun.As we finish our jobs, we proudly look at our creation. The lunch is served in the dining tent. 


Rohatang Pass

After a while when everybody is settled, Sharvari and I venture out to some photography. Shardul and Tanaya join us after some time. We spot eagles and a few more birds. Tanaya spots a weird animal. All of us try to capture it in our camera how ever it disappears in fraction of a second. We guess it was Raccoon. The sky is clear but cold is catching up in the air.  Sushant, Anirudh, Sachin and Chandan come out to check on us. We are able to see the Rohtang Pass in front of us. Hanuman Tibaa and Seven Sisters are over looking us. This will be our first night in the tent after almost two years. Cold winds encircle us. We shiver in the breeze, yet feel the warmth of gigantic Himalayas.  It is amazing how this cold mountain calls us every season so warmly to visit it. We the children of Sahyadri sleep  peacefully in the lap of Himalaya the big brother.
                                                                                                                                                               
                                                                                                                                                                    To be continued…………..

Sunday, 18 November 2018

सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला

मैलाचा दगड नाशिक फक्त दहा
साधारण एक महिन्यापूर्वीची रविवार सकाळ. असेच ढाक चा बहिरी वर गिर्यारोहण करत असताना आम्ही ठरवून टाकले की काहीही झाले तरी दिवाळी नंतरच्या शनिवार-रविवारी पुण्याहून सायकलवर नाशिक गाठायचे. मग काय सारी जुळवाजुळव सुरु झाली. आम्ही लागलो मग  आनंद यात्रेच्या तयारीला.

सायकली तयार झाल्या, मार्गावरील टप्पे ठरले आणि वाटेत मदत लागली तर म्हणून टेम्पो देखील निश्चित केला. काही गळाले आणि काही मिळाले असे करत आमचा  आठ जणांचा कंपू तयार झाला देखील. 

सुरुवातीचा एक क्षण
१० नोव्हेंबरची  पहाट उजाडली आणि चंदनचा फोन किणकिणला. सचीनने सेल्फी टाकून आपण उठल्याचा पुरावा दिला होता. चला सुरुवात तर चांगली झाली असे म्हणत आम्ही पहाटे साडेचार वाजता फर्ग्युसन रस्त्यावर जमलो देखील. सुरुवातीची सायकलींची किरकोळ जुळवाजुळव झाल्यावर आमचे पाय पेडल वर स्थिरावले आणि चाके फिरू लागली. मुंबई पुणे रस्त्यावर सचिनची आरोळी ऐकल्यावर हायसे वाटले. तो टेम्पोत सायकल टाकून खुशाल बसला होता. आम्हाला पाहिल्यावर त्याने सायकल उतरवली आणि आमची सफर ख-या अर्थाने सुरु झाली. बघता बघता नाशिक फाटा आला आणि गेला. आम्ही चाकणला कधी पोचलो ते कळले देखील नाही. काही वेळात तिमिराचे साम्राज्य संपून सा-या दिशा उजळल्या. आमचा वेग वाढला आणि उत्साह देखील द्विगुणीत झाला. थोड्याच वेळात अवसरीच्या घाटात आम्ही सायकली दामटवू लागलो. अतिशय मोहक सकाळ होती ती. उन्हाच्या आत घाटमाथा सर केल्यामुळे विशेष खुशीत येऊन आम्ही उदरभरणाची सोय केली. 

एव्हाना आम्हाला मोठ्या चौपदरी रस्त्याची सवय होऊ लागली होती. डोंगरमाथ्यावरचा गार वारा खाऊन मने सुखावली होती. इतक्यात परत अचानक छोट्या दुपदरी रस्त्यावर आम्ही फेकले गेलो. शार्दुल आणि द्रुमिल अगदी सहजपणे सगळ्यांच्या पुढे सायकल दामटवत  होते. या तरुणाईचा जोश पाहून आमच्या सायकली देखील आपोपाप गतिमान होत होत्या. आता मागील वाहनांची वर्दळ जाणवू लागली होती. मी मागचे दिसण्यासाठी लावलेल्या आरशात पहात सावधपणे सायकल हाकत होते. माझ्या मागे अगदी कोरी करकरीत चासी घेऊन एक ट्रक चालक येत होता. मी थोडी बाजूला सरकण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण माझ्या ध्यानात आले की त्या ट्रक चालकाला अजिबात घाई नाहीये तो माझ्या मागून अगदी सुरक्षित अंतर ठेवून सय्यमाने ट्रक चालवत राहिला. रस्ता जरा मोठा झाला आणि तो माझ्या शेजारून पुढे जाऊ लागला. मी त्याला जमेल तसे अभिवादन केले. आणि काय आश्चर्य त्याने थोडे पुढे जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मला हात जोडून नमस्कार केला. अगदी छोटासा प्रसंग पण मनाला भिडला आणि मनातल्या सुखाला देखील. 

नारायणगाव चे आगत्य
असेच थोडे पुढे जातोय इतक्यात आम्हाला काही सायकल स्वार दिसले. सगळ्यांनी एकाच प्रकारची जर्सी घातली होती त्यामुळे लांबवरून देखील ते उत्कंठा वाढवत होते. जवळ गेल्यावर समजले की ते काश्मीर ते कन्याकुमारी अशा प्रवासाचा सराव करत आहेत. दरम्यान हेमंतशी त्यांच्याशी  बरेच बोलणे झाले होते. ही मंडळी डिसेंबर महिन्यात प्रवासाला निघणार होती. त्यांनी दररोज साधारण १४० किलोमीटरचे अंतर सायकलीवरून कापत साधारण एक महिन्यात हा प्रवास संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरावासाठी ते शिर्डीला निघाले होते. त्यांच्याशी बोलल्यावर सगळ्यांच्याच अंगात उत्साहाचे भरते आले आणि आम्ही नारायणगावाच्या जवळ पोचलो देखील. मी आणि अशोक आता मागे पुढेच होतो. गावातील भर दुपारची रहदारीची वेळ होती. आम्ही दोघे गर्दीतून वाट काढत बस डेपो पाशी पोचलो. श्रीराज या मसाला दुधाच्या दुकानात पुढे पोचलेले सायकल स्वार बसलेले दिसले आणि आम्ही आमच्या सायकली तेथे वळवल्या. सगळ्यांची नीर-क्षीर  क्षुधाशांती होते न होते तोच, दुकानाचे मालक सुनीलभाऊ इचके स्वतः आमच्या समोर उभे ठाकले. आमची विचारपूस करून ते म्हणाले की त्यांचा १२५ लोकांचा एक गट आज शिर्डीला सायकलने जाणार आहे. नारायणगाव सारख्या छोट्या गावातून देखील इतके सायकल प्रवासी निघू शकतात हे कौतुकास्पदच. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर चांदनने बिल देण्यासाठी खिशात हात घातला परंतु श्रीराजच्या मालकांनी  स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले सायकलीस्टकडून ते कधीच पैसे घेत नाहीत.

सचिन : विजयी वीर
श्रीराजच्या पाहुणचाराने सुखावून त्यांनीच सुचवलेल्या बोटा या गावानजीक आम्ही केव्हा पोचलो ते आम्हाला काळले देखील नाही. बाराचे उन डोक्यावर तळपत असतानाच आम्ही सरोज  या उपाहारगृहाच्या दारात पोचलो देखील. सायकली व्यवस्थित लाऊन आणि मातीने भरलेली तोंडे धुऊन आम्ही जेवणावर यथेच्च ताव मारला. आता डोक्यावरचे पत्रे देखील सुखावह वाटू लागले आम्हाला. आमचा पुढचा प्रवास चार वाजता उन्हे उतरल्यावरच सुरु होणार होता. त्यामुळे जेवणे झाल्यावर जरा आराम करण्यासाठी कुठे अंग टाकता येते का ते आम्ही आजमावत होतो. इतक्यात उपाहारगृहाचे  मालक श्री. जटार म्हणाले  की पलीकडे खाटा आहेत त्यावर विश्रांती घ्या घटकाभर. अगदी मनकवडा असावा हा मनुष्य असे म्हणत आम्ही सारे पहुडलो देखील. एकमेकांचे अनुभव ऐकत आणि छोटीशी डुलकी काढून उन्हे उतरण्याची आम्ही वाट पाहू लागलो. त्या क्षणी जर कोणी आम्हाला विचारले असते की स्वर्गीय सुख म्हणजे काय तर सगळ्यांनी एक मुखाने उत्तर दिले असते, आता अनुभवतो आहोत तेच, दुसरे काय?
चार वाजता परत सायकल वर स्वार  होऊन आम्ही संगमनेर कडे वाटचाल सुरु केली. चढ उतारांचा रस्ता पार करत चंदनापुरी घाटाच्या मार्गावर कधी पोचलो ते समजलेच नाही. शेखरच्या शाब्दिक कोट्यांना आता उधाण आलं होतं आमचा हा अनोखा सायकल प्रवास निम्यावर येऊन पोचला होता त्यामुळे सुखाचा हिंदोळा मनाला झोके देत होता. अशाच प्रसन्न वातावरणात आम्ही संगमनेर पाशी पोचलो देखील. पंचवटी हॉटेल चा पत्ता शोधून  सायंकाळी ७.३० ला आम्ही हॉटेलच्या दारात पोचलो तेव्हा मनात आनंद मावत नव्हता. सारे आपापल्या खोल्यांमध्ये पांगले. काही मिनिटांमध्ये चंदनला स्वागतकक्षातून फोन आला, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे. आम्ही पुणेरी शिष्ट पणाने म्हणालो की आमच्या येथे कोणीही ओळखीचे नाही त्यामुळे त्यांना विचारा की त्यांना नक्की आम्हाला भेटायचे आहे का? इतके झाल्यावर आम्हाला राहवेना आणि मग अगदी सेलेब्रिटीच्या ऐटीत आम्ही खाली उतरलो. स्वप्नील  आमची वाटच पहात होते. त्यांच्या बोलण्यातून मग सारा उलगडा झाला. एका दुचाकीस्वाराने संगमनेर मध्ये शिरता शिरता सचिनची विचारपूस केली होती.  हे गृहस्थ म्हणजे डॉ. सोमण. त्यांना आठ जण पुण्याहून सायकल हाणत आले आहेत याचे कौतुक वाटले आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सायकल ग्रुप वर ही माहिती पाठवली आणि आमच्या पाठोपाठ स्वप्नील   हॉटेलवर येऊन पोचले. स्वप्नील पुण्याचेच रहिवासी परंतु दिवाळीसाठी आई वडलांकडे आले होते. ते स्वतः उत्तम सायकलीस्ट असल्यामुळे अत्यंत आत्मीयतेने त्यांनी आमची चौकशी केली. आणि उद्या सकाळी भेटू असे सांगून आमचा निरोप घेतला. 

आमची टीम निलेश आणि स्वप्नील बरोबर : संगमनेर सोडताना
दुस-या दिवशी सकाळी आम्ही तयार होऊन मार्गस्थ होतो न होतो तोच स्वप्नीलने   अचानक सायकल वरून आम्हाला गाठले. त्यांच्या बरोबर त्याचा मित्र निलेश देखील आम्हाला सामोरा आला. आता मात्र आम्हाला खरोखरच कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे वाटायला लागले. त्या दोघांनी आम्हाला पुढील रस्ता समजावून दिला आणि आता फक्त उतारच लागणार अशी हमी दिली. त्यांच्या आश्वासक शब्दांनी आम्हाला आणखी जोम आला आणि झुंजूमुंजू होता होता आम्ही पुढच्या टप्प्याला पोचलो देखील.

नाशिक मध्ये आगमन
आता नाशिक अगदी २० किलोमीटर राहिलं होतं. सगळ्यांचे डोळे मैलाच्या प्रत्येक दगडावर स्थिरावत होते. अखेर आम्हाला नाशिकमध्ये स्वागत असा फलक दिसला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आम्ही तपोवनाच्या रस्त्याला लागलो आणि सचिनचा मित्र जयपाल जमादार आमच्या स्वागताला उभा असलेला दिसला. त्याच्या पाठोपाठ आम्ही त्याच्या इमारतीत घुसलो. त्याने गुलाबाची फुले देऊन आमचे स्वागत केले. आमच्या विजयाच्या जयघोषात सारा परिसर दुमदुमला. 

दोन दिवसाची, दोन चाकांवरची दोनशे किलोमीटरची ही आनंद यात्रा आता समारोपाच्या अखेरच्या
डावीकडून : अशोक, शार्दुल, शेखर, चंदन, हेमंत, अश्विनी, द्रुमिल, सचिन आणि जयपाल
टप्प्यावर आली होती. आमच्या सायकली कृतार्थपणे टेम्पो मध्ये विराजमान झाल्या. आमची मने मात्र सुखाच्या परमोच्च शिखरावर पोचली होती. आम्ही सायकल प्रवासाचा हा अनवट मार्ग स्वीकारला आणि या मार्गावर आम्हाला अनेक सुखद अनुभव येत गेले. 

कोणी आम्हाला मसाला दुध पाजलं  तर कोणी जेवल्यावर विश्रातीसाठी जागा दिली. कुणी रस्त्यावर स्वतःचा खोळंबा  झाला तरी मोठ्या मनाने आम्हाला पुढे जाऊ दिल तर कोणी आमची स्वतः येऊन विचारपूस केली. एकंदर काय, सुखाच्या या प्रवासात अनेक जण दोन पावले चालले आणि आमचा आनंद द्विगुणीत केला. अगदी तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात ते सार्थ झाल,
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे.......

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

हीच खरी आतरंगी माणसे 😀 जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नो...