Wednesday, 15 January 2014

एक प्रवास - बसचा



रात्री  साडे दहा ची वेळ.  जंगली महाराज रस्त्यावर  रिक्षा ची वाट पाहिली इतक्यात आपली सर्वांची लाडकी पी एम टी दिसल्या मुळे आम्ही बस मध्ये चढतो. बस  कंडक्टर तिकीट देवून आम्हाला पुढे जाऊन  थांबण्याची विनंती करतो.  गर्दी फारशी नसल्यामुळे समोरचा रस्ता अन  चालक दोघेही स्पष्ट  दिसत आहेत. पी एम टी  वेग घेते  आणि प्रचंड वेगात    डेक्कन च्या बस स्टॉंप मधे घुसते. प्रवासी चढतात आणि क्षणाचाही विलंब करता बस वेग घेते आणि १० मीटर जावून कचकन ब्रेक दाबून थांबते. समोर दोन दुचाकी स्वार गप्पांमध्ये दंग. चालकाला बहुतेक हॉर्न वाजवण्याची मनाई होती की काय देव जाणे. मग चालकाचे आग पाखडणे आणि बस चा प्रवास खंडूजी बाबा चौका कडे. बस,  स्टॉंप वर थांबता सिग्नल वर जावून धडकते. काही प्रवासी पळत येउन बस पकडतात


चालक बस चालवत असताना कंडक्टरला सांगतो, “आता मी बस जोरात चालवणार आहे. जर कोणी मागून उतरले तर त्याला लाथ घाल वगैरे वगैरे.”  इतक्यात एक माणूस चालका पाशी येतो आणि ओरडू लागतो. “काय रे तुला बस स्टॉंपवर थांबायला काय झाले. आम्ही दिसलो नाही का?”  चालक आता मागे बघत बस चालवतो आहे. त्याने बहुधा कधी  तरी हिंदी सिनेमात काम केले असावे. दोघांची प्रचंड बाचाबाची सुरु. चालकाचे डोळे रस्त्यावर नसून प्रवाश्याकडे. इतक्यात आमच्या सुदैवाने नळ स्टॉंप येतो आणि माझी उतरायची वेळ येते. मी राहवून त्यांना सल्ला देते की आधी त्यांनी मनसोक्त भांडून घ्यावे आणि मग बस सुरु करवी. परंतू अनाहूत सल्ला पटल्याने बस मर्गस्थ. दुसऱ्या दिवशी अपघाताची बातमी नसल्यामुळे  जिवात जिव आला. इतक्या प्रचंड निष्काळजी ड्रायविंग मधूनही प्रवासी सुखरूप घरी पोचले  म्हणायचे.

No comments:

Post a Comment

Fascinating Foods

I am not a foodie. Nor am I in love with food to the core. But I certainly love everything that is served on the platter with love and affec...