Search This Blog

Tuesday, 23 September 2014

शाब्दिक चकमक




सकाळी सात ची वेळ. स्थळ चांदणी चौक. एक दुचाकी स्वार माझ्या सायकल शेजारून मोबाईल वर बोलत बोलत जातो. त्याला मी हटकते. “अहो फोन वर बोलताना गाडी चालवू नका. तो “ अर्जंट कॉल होता.” मी, अहो असेच अर्जंट कॉल घेत राहिलात तर तुम्हाला यमराजाचाच  अर्जंट कॉल येईल. दुचाकी स्वार खजील. 
 
अशीच सकाळची वेळ. ऑफिसला जाण्याची घाई. सिग्नल ला माझी गाडी थांबते. पलीकडच्या गाडीतून चालक साहेब मुखरस भूमातेला अर्पण करतात. मी गाडीची काच खाली घेऊन म्हणते, तुम्ही थुंकलात?” ते चालक महाशय “ तुमच्या गाडीवर नाही हो, जमिनीवर.” मी “ अहो मग तर आणखी वाईट. ती भूमाता नाही का आपली? आपल्या आई वर कोणी थुंकतो का? इतक्यात सिग्नल आणि चालकाचा चेहरा रंग बदलतात. 

अशीच एक मध्यान्हीची वेळ. माझ्या गाडी समोर नगरसेवक अशी पाटी लावलेली गाडी रस्त्याच्या उलट बाजूने येऊन उभी. मी गाडी जवळ नेवून थांबवते व दार उघडून बाहेर येते. मालक व चालक संभ्रमित. मी जाऊन मालकांना गाडी मागे घेण्यास सांगते. ते स्तब्ध. आता मला बौद्धिक घेणे भाग पडते. “ कस आहे साहेब, आपल्या देशात रस्त्याचे दोन भाग केले आहेत. एक जाण्यासाठी आणि दुसरा येण्यासाठी. तुम्ही रस्त्याच्या वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे चुकीच्या दिशेने गाडी चालावताय म्हणून मागे घ्या. तो माणूस हात जोडून म्हणतो. “ताई, आमचे घर विरुद्ध दिशेला बांधलय काय करणार.” This time Ashwini shocks and Nagarsevak  rocks.  बरोबर आहे. महापालिकेने नगरसेवकांची तरी सोय बघायला नको? कसेही रस्ते बांधतात लेकाचे. 

अशीच संध्याकाळी घरी जाण्याची घाई. मी सायकल track वर सायकल वर स्वार. इतक्यात दुचाकी स्वार  सायकल  track वर आलेला पाहून मी त्याला बाहेर काढते व मार्गस्थ होते. तो चरफडतो. थोड्या वेळाने सायकल  track संपल्या मुळे मी रस्त्यावर त्याच दुचाकी स्वाराच्या शेजारी. तो माझ्या कडे तुच्छ कटाक्ष टाकून म्हणतो “ आता तुम्ही का आलात आमच्या रस्त्यावर. आता मला भाषण देणे भागच. “ कसे आहे साहेब, तुम्हाला माहितेय ना?, जर तुम्ही रल्वेने प्रवास करत असाल आणि   general compartment  चे असाल तर तुम्हाला रिझर्व मधे प्रवेश नाही. परंतु जर तुम्ही रिझर्व चे असाल तर तुम्हाला general  किवा रिझर्व काहीही चालते. समजले का तुम्हाला? तो मनुष्य चक्रावून, “प्राध्यापक वाटते.” आणि डोक्याला हात लावून पसार. मी माझ्या सायकल वर स्वार. 

माझ्या घरच्यांना माझी प्रचंड काळजी वाटते. अशा आगाऊ पणा  मुळे  मी संकटात येईन अशी चिंता त्यांना सतत सतावते. पण मी तरी काय करू. हे सर्व खर तर आपण सर्वानीच केले पाहिजे. पण आपल्याला वेळ नसतो, किवा भिडस्त पणा  नडतो किवा its none of my business अशी भावना.
एकंदर काय. ते एकटे मोदी काय काय करणार हो. म्हणून आपला मुंगीचा भार उचलण्याचा हा प्रयत्न.  

4 comments:

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

हीच खरी आतरंगी माणसे 😀 जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नो...