सालाबाद प्रमाणे आमच्या
इमारतीच्या आवारातील झाडांच्या फांद्या छाटण्याची निकड निर्माण झाली. आता सरकारी
ऑफिस चे उंबरे झिजवणे आले. पण माझ्या सारखी आळशी स्त्री असे काही करेलच का? मग काय
मी सरळ मोबाईल चा आसरा घ्यायचे ठरवले. माननीय मोदींनी आपल्यासाठी डिजिटल च्या खिडक्या उघडल्या आहेतच मग त्यातून
जरा डोकावून बघायला काय हरकत आहे. मी आपले पुणे कनेक्ट चे एप उघडले आणि लिहून
टाकली तक्रार. “आमच्या इमारतीतील आम्हीच लावलेली झाडे आता हाताबाहेर चालली आहेत.
त्यांना आवारा.” आणि दिला एक फोटो
चिकटवून.
साधारण एक आठवडा असाच गेला
आणि संध्याकाळी माझा फोनू मंजुळ पणे किणकिणला. “म्याडम उद्यान विभागातून बोलतोय.
तुमची तक्रार होती ना?”. मी, “होय. झाडाच्या फांद्या छाटायच्या आहेत.” उद्यान राव,
“अहो पण ही ऑन लाईन तक्रार आहे. ती नाही चालायची. अगदी अर्जंट तक्रारच फक्त ऑनलाईन
घेतली जाते.” यावर मी वैतागून, “असे का? तुम्ही अर्जंट तक्रारीचे निवारण एक
आठवड्याने करता का? असे कसे? आता उद्यान राव पेटले आणि वाद घालू लागले. मग मी लगेच
माझे ब्रम्हास्त्र काढले. “हे बघा तुम्ही जर माझी तक्रार घेतली नाही तरी मी PMO ऑफिस
ला कळवीन की DIGITAL INDIA चा अजिबात उपयोग होत नाही. उद्यान राव वरमलेसे वाटले. त्यांनी तुमचे काम करतो असे
अश्यासन देऊन फोनु ठेऊन दिला.
अजून तीन चार दिवस गेले.
परत दुसर्या उद्यान रावांचा फोन. ते म्हणे मला फांद्या तोडण्याची परवानगी देण्यास आतुर
होते. पण माझा डिजिटल अर्ज त्यांना मान्य नव्हता. मग परत वादावादी आणि मग
ब्रम्हास्त्र. हे उद्यान राव सुधा धारातीर्थी पडले आणि म्हणाले देतो परवानगी.
असेच साधारण एक डझन उद्यानराव
मला फोन वरून कागदी अर्ज पाठवा असे
सांगण्यासाठी रणांगणात उतरवण्यात आले परंतु मी बधले तर काय पाहिजे?
शेवटचे उद्यान राव मात्र
काल म्हणजे सोमवार दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी घरपोच परवानगी घेऊन आले. आणि हो.
डिजिटल नाही बरे का. अगदी कागदावर. लेखी.
तर मित्रहो. डिजिटल
इंडियाचा पूर्ण वापर करा. थोडा वेळ लागेल आपल्या नगर पालिकेच्या कर्मचार्यांना पण घेतील
ते सवय करून डिजिटल तक्रारींची. उगाच सरकारी ऑफिसात जाऊन त्यांचा आणि तुमचा वेळ
वाया घालवू नका.
आजच तुमचा फोनु उघडा. त्यात
गुगल प्ले स्टोर वर जा आणि PUNE CONNECT नावाचे एप डाउनलोड करा. त्यावर नोंदणी करा
आणि मग करा सुरुवात तक्रारखोरी करायला. तुमची गल्ली झाडली गेली नसेल. रस्त्यावर
कचरा साठला असेल, रस्त्यावरचे दिवे लागत नसतील, पाणी आले नाही, रस्ते खराब असतील,
अशी कोणतीही तक्रार असेल तर बेधडक लिहा. आणि पुण्याचे काम करा. येथे तक्रार
दिल्यावर त्याचे निवारण झाले की नाही त्याची नोंद होते. आणि कार्माचा-यांवर काम
करण्याची आणि ते न केल्यास का केले नाही याचे उत्तर देण्याची जबाबदारी असते. तर
लोकहो, उचला फोन आणि डिजिटल व्हा.
https://pmc.gov.in/en/pune-connect
PMC MOBILE APP FEATURE
- PMC CARE: Log and Track Grievance on the go.
- Property Tax: Add Property, Check No Dues, and Pay Tax features are provided in the application.
- Water Tax: Add Consumer Number, Get Bills, Check No Dues features are available in application.
- Emergency Services: Key Emergency numbers are available in the app.
- Perception Survey: Citizen Survey available in app. Citizen can provide feedback of any PMC services availed in past.
- Directory: PMC Office directory is available in the app.
- Who’s Who: PMC Who's Who is available in the app.
Thank you Ashwini for sharing. I am downloading the app now.
ReplyDeleteGreat effort and hope very soon it will work more effectively. Thanks for the sharing
Delete