Monday 31 August 2020

वेड्या रविवारची कहाणी

 

मै और मेरी तनहाई 

लॉक डाऊन ची मरगळ जरा कमी होतेय. आम्हाला  रिकामपणचे उद्योग सुरु करण्याचे वेध लागतायत. एकदा तो करोना हद्द पार झाला की कुठे कुठे ट्रेकिंग ला जायचं या बद्दल गप्पा झडतायत. आणि माझी मात्र सायकलिंगची ओढ अनावर होतेय. मी सगळ्यांना सारखी समजावते की सद्य परिस्थितीत सायकल प्रवास हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्या सायकल वाऱ्या सुरु झाल्या देखील. मग दर शनिवारी पुण्याच्या सर्व दिशा धुंडाळून होतात. मागचा रविवार मात्र थोडा वेगळा.

अनिरुद्ध आणि हेमंत बरोबर ठरलेले सर्व बेत ऐनवेळी रद्द होतात पण माझे हट्टी मन अजिबात माघार घेऊ इच्छित नाही.  मी उद्या एकटीच सायकलिंगला जाणार असल्याची घोषणा करते. इतक्या वर्षाच्या अनुभवाने चंदनने माझ्या नादी लागणे सोडून दिलेय त्यामुळे तो मूक पाठींबा दर्शवतो.

२०१४ साल पर्यंत केलेल्या सोलो सायकलिंग चा अनुभव गाठीशी असतोच.  रविवारी सकाळी ५.३० वाजता मी सायकल वर saddle bag लावते आणि मार्गस्थ होते. निर्मनुष्य रस्त्यावरून दोन चाके संथ गतीने धावू लागतात आणि माझे मन मात्र वायू वेगाने पुढे धावू लागते. 

वाघोलीचा वाघेश्वर

    आता माझा माझ्याशी संवाद सुरु होतो. सोलो सायकलिंगचा हा     पहिला एक तास मला खूप आवडतो. या तासात आधी मन        संभ्रमित असतं. थोडी हुरहूर असते. त्या एकटेपणाची अजून        सवय होत असते. थोडी मजा वाटते आणि ग्रुप सायकलिंगची        धमाल आठवून जरा कससही वाटते.  यातच कुठे तरी आपला        आपल्याशी संवाद सुरु होतो. विचारांचा गुंता सुटायला लागतो        आणि आपल्या विचारांना आपल्या मनात शिरायला जरा वाव        मिळू लागतो.

“अरेच्चा इतके काही वाईट नाही आपले मन. बरे आहे की. जमतंय की आपल्याला थोडा अंतरंगाशी संवाद साधायला.” असे म्हणे म्हणे पर्यंत वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरा पर्यंत मी पोचते देखील. आज फोटो काढायला कोणी नाही मग मी मोबाईल काढून त्यात एक सेल्फी क्लिक करून टाकते. वर एक व्हिडीओ पण शूट करते.  प्रूफ हवेच हो सगळ्याचे. माझी black beauty आपली गप गुमान उभी. 

रस्ता अगदी सरळ सोट आणि माझा उत्साह शिगेला पोचलेला त्या मुळे वडू फाटा येतो देखील. आत वळल्यावर मात्र न

Black Beauty

राहवून मी एका हाताने handle धरून  दुसर्या हाताने मोबाईल मध्ये व्हिडिओ घेते. मेरा भारत महान वगैरे घिसे पिटे संवाद बरळून झाल्यावर माझे समाधान होते. आज असले अघोरी प्रकार करण्या पासून थांबवायला चंदन नाही. पण त्याला आठवून मीच हे चाळे बंद करते. इतक्यात एक माणूस दिसतो. बऱ्याच वेळात कुणाशी बोलता आलं नाही म्हणून की काय, मी त्याला विचारते, वडू चा रस्ता हाच का हो भाऊ? भाऊ साहेब मला उत्साहानी माहिती देतात, या बाजूला वडू खुर्द, आणि त्या बाजूला  बुद्रुक. तुम्हाला कुठे जायचंय. मी प्रांजळ पणे सांगते, तसं काही नाही, कुठलंही चालतंय की. भाऊ साहेब shocks and अश्विनी rocks. पण मी तरी काय करू. माझ खरच काही ठरलेलं नसत त्या वेळी. मग मी ठरवते आधी खुर्द आणि मग बुद्रुक.

त्या टुमदार गावाचा रस्ता नदीच्या घाटा पाशी संपतो. मग माझे पुन्हा एकदा मोबाईल मध्ये बरळून होते. दात काढून सेल्फी होतो. पोटपूजा होते, सायकल चे फोटो काढून होतात तरी भरपूर वेळ उरतो.  मग मी उगाचच त्या संथ वाहणा-या भीमा माई कडे बघत बसते. याच तीरावर, कधी तरी छत्रपती संभाजी महाराज वावरले असतील अशा विचारांनी मन भरून येते.

त्या निर्मनुष्य घाटावरून मन निघत नाही आणि पाय थांबत नाहीत. तेव्हढ्यात घरी फोन करायचा होता याची आठवण होते. पटकन एका वाक्यात मी कुठे आहे हे सांगून फोन बंद. त्या निरव शांततेत इतकेही बोलण्याची इच्छाच होत नाही.

परत हमरस्त्याला लागल्यावर अचानक संभाजी महाराजांच्या समाधी कडे अशी पाटी दिसते आणि मी बुद्रुक वगैरे विसरून मातीच्या रस्त्याला लागते. शेताच्या कडे कडेनी हा नयनरम्य रस्ता मला परत नदी काठी घेऊन जातो. आणि पाहाते तर काय एक प्राचीन कठडे विरहित पूल समोर उभा ठाकतो. त्या ब्रिज वर सायकल दामटवून पलीकडच्या तीराला लागते सुधा. त्यात मोबाईल वरून एक व्हिडीओ काढण्याचा अचरटपणा करून होतोच.



            
माझा पण फोटू
    
    नदीचा धीरगंभीर आवाज माझ्या चंचल मनाला आवर घालतो. थोडा वेळ मन स्थिर झाल्यावर त्या     अनाम स्थळावरून मी गाशा गुंडाळते. Finally कोरेगाव भीमा येत आणि मी नगरच्या दिशेने         सायकल हाकू लागते. आता मला केळी दिसतात. मग उगाचच थांबून केळी घेते. केळ हे             निमित्त मात्र, खर तर माणसाशी बोलायची ओढ. मग दादाला उगाचच पुढचे गाव किती दूर आहे      वगैरे  विचारून होते.

  आता सणसवाडी आली. इतक्यात फोन वाजतो. दादांचा (वडिलांचा) फोन. त्याना मी सायकलिंग ला     गेलेय हे एव्हाना कळलेलं असतं. सोशल मीडियाची ऐशी की तैशी. मग मी थांबून गप्पा मारून      घेते. गोल्डा     मायर, इझराइलची स्थापना, जडण घडण आणि असेच इतरांना वायफळ वाटेल असे काहीही. मग मला आठवते की मी सोलो सायकलिंगला आलेय. मी तसे सांगून फोन बंद करते. सणस वाडी तून माझे मन खरे तर रांजणगाव कडे  धाव घेतेय. पण आता मन भरलंय आणि पाय भरून  येतायत.  

किती तरी वर्षांनी असा निवांत एकांत मिळाला. अंतरंगाशी दोस्ती करायला उसंत मिळाली. संवाद न साधल्या मुळे मनात निर्माण झालेले वितंड वाद मिटले.

Aimless भटकून झालं, fearless व्हिडीओ काढून झाले, चिखलाच्या रस्त्यावरून सायकल दामटवून झाली. निर्मनुष्य घाटावर स्वतःलाच सोबत करून झाली, उतारावर सुसाट सायकल हाणून झाली, तोंडावर येणा-या वारयाची स्पर्धा करून झाली. आता काही म्हणजे काही करायचं राहिलं नाही अस लक्षात आल्या वर मी निमूटपणे घरात शिरते. परत तेच शहाण आयुष्य जगायला. पण आता त्या शहाण्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्या वेड्या मनाशी दोस्ती करून आलेय ना मी आज.

शुद्धी महत्वाची तनाची आणि मनाचीही............

46 comments:

  1. भन्नाट, छान. Much needed journey for everyone. Reminded me most of my rides. Though we start in group, long distance ride मध्ये आपण कधी एकटे पडतो ते कळतच नाही आणि मग सुरु होतो असाच प्रवास, जो कधी संपूच नये असे वाटणारा....

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot Baban. Yes we cyclists can connect to this feeling better than anyone else.

      Delete
  2. छानच लिहिले आहे. स्व साठी दिलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम पर्याय नक्कीच आहे. सर्व अनुभव तसेच्या तसे पोचले आणि भावले सुद्धा. मला जणू डोळ्यासमोर दिसत होतो, हीच तुझ्या लेखनाची मोठी पावती आहे. सुंदर.....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शेखर. तुझा अभिप्राय मोलाचा आहे.

      Delete
  3. वाह सुंदर लिखाण आहे... अगदी योग्य शब्दात स्वतः ची एक शैली बनवली आहेस... Ashwini rocks आम्ही सगळे shocks 🥴😀🚲

    ReplyDelete
    Replies
    1. अजित, तुझ्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात नेहमी प्रमाणे.

      Delete
  4. वाह सुंदर लिखाण आहे... अगदी योग्य शब्दात स्वतः ची एक शैली बनवली आहेस... Ashwini rocks आम्ही सगळे shocks 🥴😀🚲

    ReplyDelete
  5. This is one of your best blogs till date. Though I may be partial as a Cyclist. But each experience might be much deeper than you have explained and you have successfully penned down only the crucial part of it.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Rajesh.Yes this post will be one of my favorites too.

      Delete
  6. छान लिहिलंय, अगदी स्वतः सायकल प्रवास
    केल्याचं समाधान आणि आनंद वाटला. अगदी सहज लिखाण आहे असेच लेगीत राहा.

    ReplyDelete
  7. Yessss.....Ashwini always rocks!
    इथे वेडं असण्याचे खूप फायदे आहेत....कारण शहाण्यांसाठी जगायचे काटेकोर कायदे आहेत...चंगो म्हणतात असं....अपल्याला पटतं त्यांचं....होय ना?

    ReplyDelete
  8. Great you always rocks. It has shown one more way to connect with ourselves.

    ReplyDelete
  9. खुप छान लिहीले आहेस. Keep cycling Enjoy cycling.

    ReplyDelete
  10. Ashwini Rocks.. As usual great blog. This time I was not part of the Cycle ride, you made it really lively that felt as I am also with you in this ride. Chandan

    ReplyDelete
  11. मस्त लिहले आहेस. सगळे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. हा खरा me time. वाचून इतके छान वाटते की मला पण असे करायची इच्छा झाली. अशीच लिहीत रहा.
    अश्विनी दीक्षित

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Ashwini. I truly appreciate your keen interest in my writings.

      Delete
  12. Ekdam bhari..
    I also like cycling. Write up is very inspiring for solo bikers����

    ReplyDelete
  13. समारोपाचा परिच्छेद विशेष भारी...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल.

      Delete
  14. सुंदर लिखाण 👌💐❤️

    ReplyDelete
  15. Your passion for cycling is truly inspiring, Mam!
    Your enthusiasm for taking those long rides and finding pure enjoyment in them is a testimony of your spirit and determination.
    Keep it up...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Ninad Sir. Nice of you to read and comment.

      Delete
  16. Wah, mast write up.
    I love your enthusiasm and passion!!!!

    ReplyDelete
  17. आश्विनी rocksआणिआम्हीमूक खूप खूप सुंदरलेखनशैली अप्रतिम आमचा पण paddle न मारता प्रवास झाला छान लिहिलंय, अगदी स्वतः सायकल प्रवास
    केल्याचं समाधान आणि आनंद वाटला. अगदी सहज लिखाण आहे असेच लिहीत राहा.

    Reply

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान प्रतिक्रिया.

      Delete
  18. अप्रतिम लिखाण, आणि लिखाण इतकं जिवंत की वाचत असतांना आपण ते स्वतः अनूभत असतो ,जगत असतो

    ReplyDelete
  19. धन्यवाद समाधान.

    ReplyDelete
  20. प्रवासवर्णन मधली सहजता भावते आणि वर्णन केलेले आनंद क्षण वाचताना गुंतवून घेतात :)

    ReplyDelete
    Replies
    1. दयानंद, तुम्ही सातत्याने वाचून प्रतिक्रिया देता. त्यामुले स्फूर्ति येते.

      Delete
  21. As usual, beautiful descriptive writing

    ReplyDelete
  22. Thank you Reshma. I always wait for your comment.

    ReplyDelete

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...